ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर mirabai chanu मीराबाई चानू ४९ वजनी गटात रौप्य पदक विजेती ठरली. यानंतर तिच्यावर भारतातून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. तिने २१ वर्षानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून दिले.
पदक जिंकल्यानंतर तिने एका वृत्तसंस्थेशी बोलताना तिला पिझा खाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर डॉमिनोज पिझा pizza या प्रसिद्ध पिझा फ्रेंचायजीने मीराबाई चानू साठी एक खास घोषणा केली.
या फ्रेंचायजीने मीराबाई चानूला आयुष्यभर मोफत पिझा देण्याची घोषणा केली. त्यांनी ही माहिती ट्विट करुन दिला. डॉमिनोजने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ‘मीराबाई चानू पदक घरी आणल्याबद्दल अभिनंदन तू करोडो भारतीयांचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण केलेस. त्यामुळे तुला आयुष्यभर मोफत डॉमिनोज पिझा देण्यास अत्यानंद होत आहे.’