केंद्रीय मंत्रिमंडळ विद्युत विधेयक मंजूर करण्याचा विचार करण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय.
हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दूरसंचार सेवांप्रमाणेच वीज ग्राहकांनाही अनेक सेवा पुरवठादारांमध्ये त्यांच्या आवडीचा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. सरकारी सूत्राने सांगितले की, वीज (दुरुस्ती) विधेयक 2021 पुढील काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आणि मंजुरीसाठी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. हे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा सरकारचा मानस आहे. 13 ऑगस्ट 2021 रोजी पावसाळी अधिवेशन संपणार आहे.