याच आर्थिक वर्षात LIC ची शेअर मार्केटमध्ये एन्ट्री? जाणून घ्या कंपनीचे नियोजन

जर तुम्ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाईफ इंश्योरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC)च्या IPO ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कंपनीने आयपीओसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. तसेच पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये मार्केट रेग्युलटर सेबी(SEBI)कडे दस्ताऐवज जमा करणार आहे.  सूत्रांच्या मते वित्त मंत्रालयच्या एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, याच आर्थिक वर्षात एलआसीचा आयपीओ आणण्याचे लक्ष आहे. आम्ही वेळापत्रक निश्चित केले आहे. नोव्हेंबर DRHP जमा करण्यात येईल.

मागील महिन्यात सरकारने गोल्डमॅन सॅश(इंडिया), सेक्योरिटीज प्राइव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट इंडिया प्राइव्हेट लिमिटेड सह 10 मर्चंट बँकर्सला आय़पीओ मॅनेजमेंटसाठी नियुक्त करण्यात आले आहे. 

एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड, जेएम फायनान्शिएल लिमिटेड, एक्सिस कॅपिटल लिमिटेड, बोफा सेक्योरिटीज, जेपी मॉर्गन इंडिया प्राइव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सेक्योरिटीज आणि कोटक महिंद्रा या संस्थांचीही मर्चंट बॅंकर्स म्हणून निवड करण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे मार्च, 2022 पर्यंत कंपनीची बाजारात लिस्टिंग होऊ शकते. सिरिल अरचंद मंगलदास यांना आयपीओसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *