श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात विजय सलामी देण्यासाठी टीम इंडिया सज्ज

सीरीज आपल्या नावे केल्यानंतर आता शिखर धवनच्या नेतृत्त्वात टीम इंडिया टी20 सीरिजमध्येही आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी मैदानावर उतरणात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या टी20 मालिकेतील पहिला सामना आज रात्री 8 वाजता खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येईल. 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूंचा टीम इंडियामध्ये समावेश आहे. त्यामुळे आजचा सामना खिशात घालून श्रीलंकेविरोधातील टी20 मालिकेची सुरुवात विजयानं करण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असणार आहे. शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि हार्दिक पांड्या यांच्यासारखे स्टार खेळाडूंसह आज टीम इंडिया श्रीलंकेविरोधात मैदानावर उतरेल. 

Leave a Reply

Join our WhatsApp group