Friday, April 19, 2024
Homeराजकीय घडामोडीBreaking : MLA Prakash Awade's withdrawal from the Lok Sabha elections: आमदार...

Breaking : MLA Prakash Awade’s withdrawal from the Lok Sabha elections: आमदार प्रकाश आवाडे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

ताजी बातमी/ ऑनलाईन टीम

आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असून खासदार धैर्यशील माने यांना बिनशर्थ पाठिंबा देत असल्याचे नुकताच सांगितले. MLA Prakash Awade’s withdrawal from the Lok Sabha elections:

आमदार प्रकाश आवाडे यांनी गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले होते. मात्र आमदार प्रकाश आवाडे हे जर उमेदवार म्हणून या मतदारसंघात राहिले तर या मतदारसंघातील चित्र काही वेगळे असेल. असे अनेक जाणकारातून बोलले जात होते.

आणि आमदार प्रकाश आवाडे हे या निवडणुकीसाठी इच्छुक असून देखील त्यांना विनवणी करून थांबवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू होत्या. या हालचाली गेल्या काही दिवसांपासून दिवसाबरोबरच रात्री देखील जागवत होत्या.

आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट देऊन माघार घेण्याची विनंती केली आणि धैर्यशील माने यांना साथ देण्यासाठी आवाहन केले.MLA Prakash Awade’s withdrawal from the Lok Sabha elections

मुख्यमंत्र्यांचा हा शब्द आमदार प्रकाश आवाडे यांनी मान्य करत त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेत धैर्यशील माने यांना बिनशर्थ पाठिंबा देत असल्याचे सांगितले.

दरम्यान या सर्व घडामोडींमुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी तसेच आराखडे आखाडे काहींचे बदलले तर काहींचे बदलत आहेत यामुळे आता या मतदारसंघातील वातावरण खूप तापले आहे.
#MLA Prakash Awade’s withdrawal from the Lok Sabha elections:

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमचे चॅनल फॉलो करा

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -