स्टार्टअप ही देशाच्या भविष्याची गुरुकिल्ली असून ज्या ठिकाणी क्रिएटिव्हिटी आहे त्या ठिकाणी स्टार्टअपला वाव देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे असं उद्योगपती आणि कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया म्हणाले की
“जगातल्या अनेक देशांमध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यात येत असून राज्यात सुरुवातीला मुंबई आणि पुण्यामध्ये स्टार्टअपसाठी सरकारने जमिनी उपलब्ध करुन द्याव्यात. पुण्यात जवळापास दोन लाख प्रशिक्षित युवक असून त्यांना स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. सरकारने स्टार्टअपला स्वस्तात जागा उपलब्ध करुन दिल्या तर त्यामध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येऊ शकेल.”
खासगी उद्योगांना सर्वच क्षेत्रात मूभा द्या
उद्योजक अरुण फिरोदिया म्हणाले की, “आपल्या देशात 1991 साली जागतिकीकरण करण्यात आले. चीनमध्ये तीच गोष्ट 1975 साली झाली. त्यामुळे चीनची प्रगती भारतापेक्षा जास्त आहे. सर्वच क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना वाव मिळाला पाहिजे. पाठबंधारे, वीज निर्मिती, रस्ते बांधकाम तसेच अनेक क्षेत्रामध्ये खासगी क्षेत्राला वाव दिला पाहिजे.”
उद्योजक अरुण फिरोदिया म्हणाले की, “देशात जागतिकीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची गरज असून यासाठी सरकारी धोरण हे खाजगी उद्योजकांना मुभा देणारं हवं. सर्वच क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना वाव मिळाला पाहिजे. पाठबंधारे, वीज निर्मिती, रस्ते बांधकाम तसेच अनेक क्षेत्रामध्ये खासगी क्षेत्राला वाव दिला पाहिजे. त्यामुळे देशातील खासगी उद्योगांची भरभराट होईल आणि त्यांच्याशी स्पर्धा करुन सरकारी उद्योगही अधिक कार्यक्षम होतील.”
स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात काहीच उत्पादन नव्हते. अगदी टाचण्या, काडेपेटीही आयात कराव्या लागायच्या. आता बहुतांश सर्व वस्तुंची निर्मिती आपल्या देशात होते. देशाने शुन्यापासून ही सर्व प्रगती केली असून यामध्ये सरकार आणि लोकांचं योगदान आहे असं उद्योगपती आणि कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया म्हणाले. जगाचं नेतृत्व करायचं असेल तर इज ऑफ डुईंग बिजनेस, कम्पिटेशन रॅन्क आणि उद्योगासंबंधी इतर अनेक गोष्टींमध्ये प्रगती केली पाहिजे. भारतासोबत कोरिया, चीन हे देश स्वातंत्र्य झाले. जपानने औद्योगिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली. भारतानेही तशी प्रगती करणे आवश्यक आहे असंही ते म्हणाले.