मुंबई बुडणार?, नासाकडून धक्कादायक बाब उघड

मुंबई : पुढील दोन दशकांत अरबी समुद्र मुंबईला गिळंकृत करु शकतो. कारण या दोन दशकांत अरबी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत 0.11 ते 0.14 मीटरनं वाढ होणार आहे. ग्लोबल वर्मिंगमुळे मुंबईवर हे संकट ओढावणार आहे.


 नासानं केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आलीये. समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा अभ्यास करण्यासाठी नासानं सी लेव्हल टूल तयार केलंय. त्यानुसार काढलेल्या अंदाजात केवळ मुंबईच नव्हे तर समुद्र किनाऱ्यालगतच्या भारतातील 12 शहरांपुढे हा धोका निर्माण झाला आहे.
सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे आणि कार्बन उत्सर्जनामुळे ग्लेशियर वितळू लागलेत. त्यामुळे समुद्राची पातळी वाढणार आहे. नासाच्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.2 ते 3 दशकांत समुद्राची पाणीपातळी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.


महाराष्ट्रातील मुंबई, गुजरातमधील ओखा, कांडला, भावनगर, गोव्यातील मोरमुगाओ, कर्नाटकातील मंगळुरु, तामिळनाडूतील चेन्नई आणि तुतीकोरिन, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम, केरळमधील कोची, ओडिशातील पारादीप आणि पश्चिम बंगालमधील किडरोपोर या शहरांना याचा फटका बसणार आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group