इचलकरंजी : जांभळे – कारंडे गट एकत्र आल्यास विरोधकांना आव्हान

शहरातील एकमेकाविरोधात असलेले जांभळे कारंडे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व गट एकत्र आल्यास आगामी महानगरपालिका निवडणुकीत विरोधकांना कडवे आव्हान उभे राहू शकते. दोन वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची(Assembly elections) रंगीत तालीमही ठरू शकते. तेव्हा शहरातील राष्ट्रवादीची ताकद वाढवायची असेल तर राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शहरातील प्रमुख पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख एके काळी करण्यात येत असे. नगरपालिका निवडणुकीत २० वर्षापूर्वी २५ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस चे निवडून आले होते. मात्र राष्टवादी काँग्रेसमध्ये मध्यंतरी मोठ्या प्रमाणात गट अशोक जांभळे निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटागटामध्ये विभागला गेला ‘मी’च पक्षाचा नेता अशी भूमिका अनेक नेत्यांनी घेतली त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पेक्षा नेत्यांची संख्या मोठी झाली. कार्यकर्ता ही प्रत्येक नेत्यांच्या मध्ये विभागला गेला तर काही कार्यकर्ते पक्षांमधील गट पाहून पक्षातून बाहेर पडले. काहींनी आपली स्वतंत्र चूल मांडली. त्यामुळे पक्ष कमकुवत होत गेला. तरीही आज जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते एकत्र झाले तर ते महानगरपालिका ताब्यात घेऊ शकतात तसेच आमदारकीही आपल्याकडे ठेवू शकतात. मात्र यासाठी शहरातील सर्व नेत्यांची एकत्रित मूठ बांधणे गरजेचे आहे.

सध्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मुख्य आणि प्रबळ गट आहेत त्यामध्ये अशोकराव जांभळे गट आणि मदन कारंडे गट यांचा समावेश होतो. परंतु हे गट एकत्र येण्याची शक्यता धूसर दिसत आहे. जर हे दोन गट एकत्र आले तर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता हमखास येऊ शकते, असे बोलले जात आहे. जांभळे गट आणि कारंडे गट एकत्र येऊ नये यासाठी काही व्यक्ती नेहमीच प्रयत्नशील असतात त्याचा फटका राष्ट्रवादीला होऊ शकतो.

प्रामुख्याने इचलकरंजी शहराचा विचार केल्यास विक्रमनगर, जवाहरनगर, शहापूर, साईट नंबर १०२ या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. तसेच शहरातील मंगळवार पेठ या ठिकाणी राष्ट्रवादी नेहमीच आपली चमक दाखवीत आला आहे. जर कारंडे आणि जांभळे गट एकत्र आले तर महानगरपालिका निवडणुकीत(Assembly elections) करिष्मा होऊ शकतो. त्यासाठी दोघांनीही एक एक पाऊल पुढे येणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यंतरी दोन्ही गटाचा स्वतंत्र मेळावा घेऊन कानपिचक्या दिल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणूक(Assembly elections) एकत्र लढण्याचे संकेत ही दिले आहेत.

या दोन्ही गटांना एकत्र येण्याचे आव्हानही केले आहे. इतक्यावर न थांबता आता वरिष्ठ नेत्यांनी आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांनी या दोन्ही गटांमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. गटातटाच्या राजकारणामुळे पक्ष खीळखिळा होत आहे हे विसरून चालणार नाही. सध्या जिल्ह्यामध्ये हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते आहेत त्यांना मदन कारंडे गट आणि अशोकराव जांभळे गट दोघेही मानतात. त्यामुळे आमदार मुश्रीफ यांनी या दोन्ही गटांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

दोन्ही गटाची मोठी ताकद

जांभळे गट आणि कारंडे गट यांनी एकत्र येऊन आपल्या सोबत शहरातील इतर सर्वांना एकत्र करून मोठं बांधली पाहिजे. अशी जर मोट महानगरपालिका निवडणुकीमध्ये या दोन्ही गटांना बांधता आली आणि वरिष्ठ पातळीवरून या दोन्ही गटांना जर बळ मिळाले त्याचबरोबर विरोधकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कडवे आव्हान उभे राहू शकते. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि दोघांना एकत्र आणण्याची गोष्ट सत्यात उतरवली पाहिजे तरच हे शक्य होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या ताकतीचा अंदाज नाही जर त्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढली तर आपली ताकद काय आहे हे त्यांना समजेल.

गटबाजीचा इतर पक्षांना फायदा

नगरपालिका आणि आमदारकी च्या निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन्हीचा फायदा झाला आहे. आता महानगरपालिका झाल्यानंतर प्रथमच निवडणुका येत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने इतर पक्षांना फायदा करून न देता आपला पक्ष सत्तेत कसा येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. कारंडे गट आणि अशोकराव जांभळे गट यामध्ये वितुष्ट आणून आपल्या उमेदवारांना आणि पक्षाला कसा फायदा होईल याचा प्रयत्न प्रामुख्याने निवडणुकीच्या काळामध्ये इतर राजकीय पक्ष करीत असतात. हे आता दोन्ही नेत्यांनी त्यांचा डाव ओळखला पाहिजे आणि पुन्हा एकदा इचलकरंजी महानगरपालिकेत सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे.

Join our WhatsApp group