माई बाल विद्या मंदिर चा पंधरा ऑगस्ट निमित्त अनोखा उपक्रम


इचलकरंजी शहरातील माई बाल विद्या मंदिरमध्ये आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.बालचिमुकल्यांकडून
प्लास्टिक बाटलींपासून दहा फूटाचा मासा तयार करण्यात आला असून यातून प्लास्टिक प्रदुषणामुळे पृथ्वीला असणारा मोठा धोका आणि तो वेळीच रोखायला हवा ,असे प्रबोधन करत संदेश देण्यात आला आहे. 
सध्या देशाबरोबरच राज्यामध्ये विविध कारणांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढू लागले. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून त्याचे घातक परिणाम ,समाजावर दिसू लागले आहेत.यामध्ये
कोरोना महामारी ,साथीचे आजार, महापूर यासारखी परिस्थिती निर्माण होवून नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.

एकंदरीत ,पृथ्वीवर सध्या प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे नागरिकांतून बेफिकीरपणा दिसून येत आहे. कोणतीही वस्तू घेतली की ती गटरीमध्ये ,रस्त्यावर व इतर ठिकाणी टाकायची ,अशी समाजाची मानसिकता दिसत आहे. त्यामुळे प्रदूषण वाढून पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला आहे.प्लास्टिक बाटल्या , कागदी पिशव्यांमुळे हवा आणि पाणी प्रदूषित होऊ लागले आहे. त्यामुळे पृथ्वीचे आयुष्य धोक्यात आले आहे.याबाबत आता नागरिकांमध्ये प्रबोधन होणे गरजेचे बनले आहे.याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील माई बाल विद्या 
मंदिरच्या चिमुकल्यांनी शहरातील गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिक बाटल्या एकत्रित करून त्यापासून दहा फुटाचा मासा तयार केला आहे.यातून हा प्लास्टिकरुपी मासा आपल्या पृथ्वीला खाऊन टाकणार ,असा इशारा देत आता आपणच प्लास्टिकचा वापर टाळत पर्यावरण संरक्षण व संवर्धन करायला हवे ,असे प्रबोधन करण्यात आले आहे. आज सोमवारी १५ आँगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माई बाल विद्या मंदिरच्या मैदानात
हा प्लास्टिकरुपी मासा पाहण्यासाठी खुला करुन या माध्यमातून चिमुकल्यांकडून प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात आलेला प्रबोधनाचा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे. यातून अनोख्या देशभक्तीचा देखील प्रत्यय आला आहे.हा मासा तयार करण्यासाठी माई बाल विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका ,सर्व शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले आह..त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे माई बाल विद्या मंदिरचे विद्यार्थी ,मुख्याध्यापक , शिक्षकांचे कौतुक होऊ लागले आहे .आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने पर्यावरण संरक्षण संरक्षणासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा ,असा अनमोल अनोखा संदेश माई विद्या मंदिरच्या चिमुकल्यांनी देवून समाजाला आदर्श कार्याचा वस्तूपाठ घालून दिला आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group