इचलकरंजी शहरात कोरोनाचे नियम पाळत सर्व शासकीय ,निमशासकीय कार्यालय ,शाळा – महाविद्यालय ,राजकीय पक्ष ,सहकारी संस्था ,सामाजिक संस्था व विविध मंडळांच्या वतीने ध्वजारोहण करुन १५ आँगस्ट भारतीय75 स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने शहरात अमाप उत्साहाचे वातावरण दिसून आले.
इचलकरंजी शहर परिसरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट उदभवले आहे. त्यामुळे मागील व यंदाच्या वर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून व आवश्यक ती खबरदारी घेत १५ आँगस्ट भारतीय75 स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आज सोमवारी सकाळी नगरपरिषदेच्या मुख्य इमारत आवारात नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी यांच्या हस्ते शासकीय पध्दतीने ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार ,मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल ,सर्व स्थायी समित्यांचे सभापती ,नगरसेवक-नगरसेविका ,अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते. तसेच प्रांत कार्यालय येथे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या हस्ते , अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते ,डीवायएसपी कार्यालयात डिवायएसपी बी.बी.महामुनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देवून राष्ट्रगीत सादर करण्यात आले.
अशाच पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून शहरातील सर्व शासकीय – निमशासकीय कार्यालय ,शाळा – महाविद्यालय ,राजकीय काँग्रेस-राष्ट्रवादी भाजपा ताराराणी आघाडी पक्ष ,सामाजिक संस्था ,संघटना ,विविध मंडळांच्या वतीने ध्वजारोहण करुन १५ आँगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.मात्र ,दरवर्षी यानिमित्त होणारे विविध कार्यक्रम ,स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक नियमांमुळे होवू शकल्या नाहीत.
असे असले तरी सकाळपासून ध्वजारोहण कार्यक्रमासह जिलेबी ,मिठाई खरेदीच्या निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य ठिकाणी देखील नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.विशेषतः प्राथमिक ,माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये देखील ठराविक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
दरम्यान ,भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी कायदा – सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.