तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतांश शहरांवर कब्जा केल्यनांतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घणी देश सोडून पळून गेले आहेत.
तालिबानी सैन्य सध्या काबूल शहराच्या सीमांवर असून अफगान सैन्यदलाने आधीच माघार घेतली आहे.
अफगाणिस्तानाच्या बहुतांश शहरांवर कट्टरपंथी तालिबानी सैन्यांनी कब्जा घेतला आहे. रविवारी काबूल शहराच्या सीमेवर तालिबानी आल्यानंतर सत्ता हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे जर सत्ता हस्तांतर झाली नाही तर हल्ल्याची धमकीही दिली जात होती.
अफगाणिस्तानच्या अधीकृत मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, तालिबानी काबूलच्या सीमेवर असून ते अद्याप आत घुसलेले नाहीत. काबूलच्या जिल्ह्यांमध्ये स्पेशल पोलिस युनिट तैनात केले आहेत.
जेणेकरून या संधीचा फायदा घेऊन सामान्यांना कुणी त्रास देणार नाही. संशयास्पद व्यक्तींना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह म्हणाले की, आम्ही तालिबान्यांशी कधीच हातमिळवणी करणार नाही.
आम्ही तालिबान्यांसमोर कधीच झुकणार नाही. मी लाखो लोकांना निराश करणार नाही. या लोकांनी माझ्यावर भरवसा ठेवला.
दुसरीकडे अफगाणिस्ताचे माजी राष्ट्रपती हमीद करजई यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
अजून चर्चेतून मार्ग निघू शकतो असेही त्यांनी सांगितले.