Friday, March 29, 2024
Homeक्रीडासूर्या पुन्हा तळपला, टीम इंडियाचा मोठा विजय न्यूझीलंडवर 65 धावांनी मात!

सूर्या पुन्हा तळपला, टीम इंडियाचा मोठा विजय न्यूझीलंडवर 65 धावांनी मात!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेती दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली. आता शेवटचा सामना जिंकून मालिका 2-0 ने आपल्या नावार करण्याची भारताकडे संधी आहे. तर किवी संघ शेवटचा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल.



तत्पूर्वी सूर्यकुमार यादवच्या नाबाद 111 धावांच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून ईशान किशनने 36 धावा आणि हार्दिक पांड्या आणि श्रेयसने 13-13 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 126 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून दीपक हुडाने शानदार गोलंदाजी करत 10 धाव देऊन चार बळी घेतले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि लोकी फर्ग्युसनने दोन गडी बाद केले, तर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या युजवेंद्र चहलने 26 धावांत 2 बळी घेतले.



भारताने दिेलेल्या 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्या चेंडूवरच पहिली विकेट पडली. फिन ऍलन खाते न उघडताच बाद झाला. यानंतर कॉनवे आणि विल्यमसन यांनी 56 धावांची भागीदारी केली. मात्र सुंदरने कॉनवेला बाद करून किवीजवर दबाव आणला. पुढच्याच षटकात चहलने ग्लेन फिलिप्सला बाद केले. या विकेनंतर भारताची सामन्यावरील पकड घट्ट झाली. यानंतर न्यूझलंडच्या नियमित अंतराने विकेट गेल्या आमि 18.5 षटकांत 126 धावांत न्यूझीलंड संघ सर्वबाद झालजा.



न्यूझीलंडकडून कर्णधार विल्यमसनने सर्वाधिक 61 आणि कॉनवेने 25 धावांची खेळी केली. भारताकडून दीपक हुडाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि सुंदरला प्रत्येकी एक विकेट मिळाली. अर्शदीप हा एकमेव भारतीय गोलंदाज होता ज्याला एकही विकेट मिळाली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -