इचलकरंजी : अब्दुल लाटेतील मुलाने रचला देशपातळीवर इतिहास ; 209 स्पीडने गाडी चालवतो ( पहा थरारक व्हिडिओ )

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका अब्दुल लाट खेडेगावातील मुलाने रचला देशामध्ये इतिहास तो 209 स्पीडने गाडी चालवतो,ऑफ रोड आणि ऑन रोड या दोन्ही खेळ प्रकारात खेळणारा भारतातील एकमेव खेळाडू छोटा खेळाडू म्हणून देशात जगामध्ये ओळखला जाऊ लागला आहे वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांनी हे मोटर बाईक खेळायला सुरुवात केली आहे.त्याचे वय वर्षे 13, त्याने आतापर्यंत देशांमध्ये व जागतिक पातळीवर सुमारे 120 पारितोषिके मिळवली आहेत त्याचे वडील शेतकरी,घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या अब्दुल लाट गावातील या बालकांचे नावं आहे जिनेन्द्र सांगावे. जिनेन्द्रने मोटर स्पोर्ट्स या धाडसी खेळात चम्पियन मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नावं जागतिक पातळीवर पोहचवले आहे.

शिरोळ तालुक्यातील जिनेन्द्र हा अब्दुल लाट गवतील खेळाडू वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याला मोटर स्पोर्ट्सची आवड आहे.सातव्या वर्षापासून त्याने स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरुवात केली.काका सागर सांगावे यांनी त्याला बळ दिले.आणि जिनेन्द्र आपल्या कार्याची पथाका फडकावत गेला.वडील शेतकरी,घरची परिस्थिती बेताची असताना त्याने आपल्या खेळात कसलीही कुचराई केली नाही.मिळेल त्या वाहनाचा आधारे त्याने सराव केला आणि पाहता पाहता तो कमी वयातील स्पर्धक देशामध्ये आणि चॅम्पियन ठरला आहे.

अनेकांना हे यश गाठण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात मात्र जिनेन्द्रने जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे.स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात नाशिक, पुणे, कोइंबतूर, बरोडा, गोवा आणि फायनल चॅम्पियनशिप राऊंड बेंगलोर अशा मोठमोठ्या सहा मेट्रोसिटीज मध्ये पार पडल्या.आणि थायलंड,स्पेन,श्रीलंका या देशात त्याने अमुलग्रह यश प्राप्त केले आहे. त्याला आवाडे अकॅडमी तर्फे त्याला मोफत मैदान देण्यात आले आहे तर जितेंद्रला अजूनही जागतिक पातळीवर नाव उंचवायचे आहे त्यामुळे जिल्ह्यातील व राज्यातील नेत्यांनी त्याला मदत करण्याचे गरज बनली आहे .

पण मोटर बाईक मध्ये तो जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील एकमेव छोटा खेळाडू म्हणून ओळखला जात आहे या खेळामध्ये सोळा वर्षापासून ते 25 वयोगटातील मुले भाग घेत असतात पण जितेंद्र हा कमी वयातील मोटर बाईक रेस मध्ये सहभाग नोंदवतो व अतिशय चांगल्या पद्धतीने बाईक चालवतो हा खेळ खेळत असताना खर्चाची बाजू मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्याला आता मदतीची गरज बनली आहे अतिशय शेतकरी कुटुंबातील हा विद्यार्थी त्याने देशाचे नाव जागतिक स्तरावर नेऊन उंचाव्य अशी जोर त्याच्या परिवाराकडून होऊ लागले त्याची परिस्थिती हालकी असल्यामुळे त्याला मदतीचा हात दिला पाहिजे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी आमदार मंत्रिमंडळाने या विद्यार्थ्याला मदतीचा हात समाजातील दानशूर व्यक्तींनी करावे अशी मागणी त्याच्या कुटुंबाकडून होऊ लागले आहे.यामध्ये जिनेन्द्रने फॉरेन एक्सपर्ट 500cc पर्यत बाईक गटात 250cc गाडीने सहभाग नोंदविला आहे.ऑफ रोड आणि ऑन रोड या दोन्ही खेळ प्रकारात तो मोटर चालवतो,209 स्पीडने त्याने थायलंड मध्ये गाडी चालवून विक्रम नोंदवला आहे.80 ते 90 फूट उंच तो गाडी जम्प मरतो.जिल्हा परिषद शाळेत सातवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या जिनेन्द्रने आज पर्यंत त्याने 120 पेक्षा जास्त पारितोषिके पटकाविले आहेत. त्याचे घर पारितोषिके भरले आहे.एम.आर.एफ. नॅशनल मोग्रिप सुपरक्रॉस चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत जिनेन्द्र सांगावे याने चॅम्पियनशिप मिळवत एक नवा इतिहास रचला आहे. आजपर्यंतच्या या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात कमी वया चा विजेता म्हणून त्याची नोंद झाली आहे. आशा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांनीच बळ देण्याची गरज आहे.तरच आणखी देशाचे नाव करेल आणि त्याची प्रेरणा घेऊन आणखी काही खळाडू तयार होतील. आयाज मुल्ला,न्यू इंग्लिश स्कूल अब्दुल लाट,आदींचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत आहे.

Join our WhatsApp group