आफताब निघाला पक्का ‘खेळाडू’, हत्येचा गुन्हा सहजपणे कबूल करण्यामागेही मोठं षडयंत्र! गुन्हा कबूल केला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवलं आहे. आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या करत तिच्या शरीराचे तुकडे करुन मेहरोलीच्या जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. त्यानंतर आता पोलिसांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या तपासात आफताबबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आफताब वारंवार श्रद्धाला मारहाण करत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. मात्र तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का ती म्हणजे आफताबने सापडल्यावर अगदी शांतपणे गुन्हा कबूल केलाय.इतक्या क्रूरपणे हत्या केल्यावर इतक्या सहजपणे गुन्हा कबूल केल्यावरही आफताबची कसली चौकशी करत आहेत. असा सवाल तुम्हाला पडला असावा, मात्र यामागेसुद्धा आफताबचा मोठा मास्टरप्लॅन असावा. नियमांनुसार आणि याच्याआधी घडलेल्या घटनांच्या निकालावरून आरोपीला कमी शिक्षा देण्यात आली आहे. पंरतु असं का? कारण अपराध हा अपराध असतो मग शिक्षेत का कमी-जास्तपणा.

आफताबने गुन्ह्याची कबुली देताना सांगितलं की, हो मी रागामध्ये श्रद्धाचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला. आफताबने हा गुन्हा जाणूनबुजून नाहीतर रागात असताना केला आहे. याचं एक उदाहरण म्हणजे, भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांची एका तरूणासोबत भांडण झाली होतीत, यादरम्यान त्यांनी तरूणाच्या नाकावर बुक्की मारली. संबंधित तरूणाचा रूग्णालयामध्ये उपचारादरम्यान झटक्याने मृत्यू होतो. या गुन्ह्यामुळे सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

आता याचा आणि श्रद्धा वालकरच्या हत्येशी काय संबंध असं तुम्ही म्हणाल. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की, कोणतीही हत्या तुम्ही जाणीवपूर्वक किंवा त्याआधी कोणतीही योजना आखून केली नाही. मात्र तुमच्याकडून स्वत:ला वाचवताना किंवा तुमच्याकडून अपघाती मृत्यू झाला तर तुम्हाला कमी शिक्षा होते. हो पण तेच जर नियोजनपूर्व कट आखून हत्या केली असेल तर त्यासाठी जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते.

आफताब पूनावाला कायद्याचा आधार घेत स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कारण आफताबने सरळ सरळ पोलिसांना सांगितलं की मी श्रद्धाचा रागाच्या भरात गळा दाबला आणि तिला संपवलं. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचं तो सांगत असला तरी त्याने श्रद्धाची हत्या नियोजितपूर्व केली आहे.

आफताब श्रद्धाला घेऊन फिरायला गेला होता मात्र त्याला त्या ठिकाणी तिला मारता आलं नाही. त्यानंतर तो दिल्लीमध्ये श्रद्धाला घेऊन जातो आणि घर घेण्याआधी आजूबाजूच्या परिसराची रेकी करतो. आफताब शांत डोक्याने श्रद्धाला संपवण्याचा कट करत होता. शेवटी घर घेतल्यावर त्याने दोन-तीन दिवसांमध्येच श्रद्धाला संपवलं. आता सहजपणे आपला गुन्हा कबूल करत रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं पोलिसांना सांगत आहे.

दरम्यान, पोलिसही आता कोर्टात आफताबने हा गुन्हा रागात नाहीतर कट आखून केल्याचं दाखवण्यासाठी पुरावे जमा करत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आफताब जेव्हा श्रद्धाचे तुकडे टाकायला जायचा त्यावेळी फोन घरी ठेवून जायचा. त्याला माहित होतं की गुन्हा समोर आल्यावर पोलीस त्या त्या दिवसांचं लोकेशन ट्रेस करत सर्व तुकडे जमा करतील. आफताब शिकला-सवरलेला होता त्यामुळे त्याने कायद्यांची माहिती घेतली होती. आता त्याचाच वापर करत तो स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

Join our WhatsApp group