इचलकरंजीत बंदोबस्ताचे कर्तव्य बजावणाऱ्याजवानाचा मृत्यू

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजी : कर्तव्य बजावत असताना गृहरक्षक दलाच्या जवानाचा हृदय विकाराच्या तिव्र धक्क्याने मृत्यू झाला. उत्तम प्रभाकर समडोळे (वय 47, रा. लिंबू चौक, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.लिंबू चौक येथे राहणारे उत्तम समडोळे गेल्या तीन दिवसांपासून बंदोबस्ताच्या ड्युटीवर होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बंदोबस्तासाठी आले होते. हजेरी पार पडल्यानंतर ते पोलिस ठाण्यातीलच सहवास कट्ट्यावर बसले होते. तेथेच त्यांच्या छातीत कळ आली. (heart attack) तातडीने त्यांना उपचारासाठी आयजीएममध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

लिंगायत स्मशानभूमी (रूद्रभूमी) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजीनगर, गावभाग, शहापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून समडोळे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गृहरक्षक दलाचे जवानही उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. मनमिळावू स्वभावाचे उत्तम समडोळे यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

Join our WhatsApp group