ताजी बातमी ऑनलाईन टीम
स्वस्त टेलिकॉम सेवांसाठी आजही अनेक स्मार्टफोन युजर्स 2 सिम कार्ड वापरतात. मात्र, दिवसेंदिवस रिचार्ज प्लॅन्सची किंमत वाढत आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिच्यावर होत आहे. त्यामुळे येत्या काळात 2 सिम कार्ड वापरण्याचा ट्रेंड बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यापूर्वी टेलिकॉम सेवा स्वस्त होत्या सोबत Sim Active ठेवण्यासाठी दरमहा रिचार्ज करण्याची सक्ती नव्हती. त्यामुळे लोक ड्युअल किंवा सेकंडरी सिम सहज वापरत होते. आता परिस्थिती बदलली आहे. टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहे. आगामी काळात यात आधी वाढ होणार आहे. आधीच वाढलेले रिचार्ज प्लान आणि त्यात सेकंडरी सिम सक्रिय ठेवणे युजर्ससाठी महाग होणार आहे. त्यामुळे हळूहळू सेकंडरी सिमचा ट्रेंडचा पूर्णपणे संपेल असे जाणकारांचे मत आहे.
टेलिकॉम कंपन्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच रिचार्ज प्लानच्या किमती वाढवल्या होत्या. यावेळीही रिचार्ज प्लानच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. याबाबत Airtel ने तसे संकेत दिले आहेत.
दरम्यान, नुकतेच एअरटेलने दोन सर्कलमध्ये आपल्या किमान रिचार्ज प्लान महाग केले आहेत. ही वाढ केवळ चाचणी असून येत्या काही दिवसांत ती सर्व सर्कलमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. एअरटेलने डिसेंबर 2021 मध्ये 79 रुपयांच्या किमान रिचार्ज प्लॅनची किंमत 99 रुपयांपर्यंत वाढवली होती.