भीषण अपघातात ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचं निधन, 50 फूट खोल कालव्यात कोसळली कार


सोलापूर जिल्ह्यातील मोडलिंब येथील रहिवासी ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देखमुख (वय-60 वर्षे) यांचं भीषण अपघातात निधन झालं. मोडलिंबकडून पंढरपूरकडे येत असताना कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली. त्यात मीना देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची कन्या,नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री ढरपूर ते कुर्डूवाडी रस्त्यावर रोपळे गावाजवळ उजनी कालव्याच्या अरुंद पुलावर हा भीषण अपघात झाला. मीना देशमुख यांच्या अपघाती निधनाने लोकनाट्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मीना देखमुख या काही कामानिमित्त मोडलिंबकडून पंढरपूरकडे रविवारी निघाल्या होत्या. पंढरपूर-कुर्डुवाडी मार्गावरील रोपळे गावजवळील उजनी कालव्याच्या अरुंद 50 फूट पुलावरून त्यांची कार थेट खाली कोसळली. पूलावरून खाली उतरण्यास जागा नसल्याने मदतकार्यात विलंब झाला. त्यामुळे मीना देखमुख यांचा जागेवरच मृत्यू झाला. स्थानिक गावकऱ्यांनी अक्षरशः दोराच्या सहाय्याने जखमींना कालव्यातून बाहेर काढले. तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींनी उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

Join our WhatsApp group