श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनावर सोमवारी (28 नोव्हेंबर) दिल्लीतील रोहिणी येथे हल्ला करण्यात आला. पॉलीग्राफ
चाचणीनंतर एफएसएल टीम आफताबला घेऊन बाहेर आली होती. यादरम्यान, काही लोकांच्या जमावाने वाहनावर हल्ला केला.
व्हॅनवर हल्ला करणाऱ्या लोकांमध्ये एकाच्या हातात तलवार दिसत होती. त्याने व्हॅनवर तलवारीने वार केले आणि व्हॅनचा दरवाजा उघडला. पण, तेवढ्यात पोलिस तिथे आले आणि त्यांनी बंदूक काढली. यावेळी हल्लेखोर म्हणाले- त्याला बाहेर काढाला, आताच मारू… पोलिसांच्या सतर्कतेमुळे आफताबचा जीव वाचला. यावेळी नाराज जमावाने पोलिस व्हॅनवर दगडफेकही केली पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारे लोक हिंदू सेनेचे कार्यकर्ते आहेत. या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन व्हॅन काढली आणि आफताबला सुरक्षित नेले.