इचलकरंजीत मोठे खड्डे, खड्डे मुजवण्याचे काम युद्ध पातळीवर ; पण रस्ता पुन्हा उतरल्याने नगरसेवक व नागरिक कठोर कारवाई करण्याची मागणी

इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ-मोठे खड्डे पडत असल्यामुळे वाहनधारकांना याचा मोठा त्रास होत होता खड्डे मुजवण्यासाठी महापालिकेने मक्तेदार द्वारे टेंडर काढण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून शहरांमध्ये खड्डे मुजवण्याचे काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरू आहे पण कालच प्रतीक प्लाझा जवळ असणाऱ्या रस्त्याची डागडूजी केली होती पण आज सकाळी गॅस पाईपलाईनच्या कर्मचाऱ्यांनी हा रस्ता पुन्हा उकरण्यात आला त्यामुळे नागरिकांनी याला विरोध केला .

रस्ता कालच पॅचवर्क केल्यानंतर आज पुन्हा का उकरला असा प्रश्न विचारला असता यावेळी गॅस पाईपलाईनच्या कर्मचारी उडवडीची उत्तरे दिली त्यानंतर घटनास्थळी माजी नगरसेवक मधन झोरे सुजित कांबळे यांनी धाव घेतली यावेळी कर्मचाऱ्यांना विचारले असता हा रस्ता तुम्ही का खोदत आहेत त्यांनी सांगितले की हा रस्ता गॅस साठी उकरतपाईप साठी उकरत आहे असे सांगितले आहे रस्ता हा कालच केला आहे पण तुम्ही आज दुसऱ्या दिवशी का उकरत आहे असे विचारले असता त्यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले कि आम्हाला अधिकाऱ्याने सांगितले अशी उडवडीची उत्तरे माजी नगरसेवक मदन झोरे व सुजित कांबळे यांना कर्मचारी दिली यावेळी या मक्तेदारावर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे एका बाजूला खड्डे मुजवायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा खड्डे काढायचे असा महापालिकेचा सध्या कामकाज सुरू आहे त्यामुळे इचलकरंजी खड्डे मुक्त कधी होणार असा सवाल वाहनधारक करू लागले आहेत कालच रस्ता करायचा आणि दुसऱ्याची उकरायचा हा धंदा इचलकरंजी महापालिकेचा सध्या बनला आहे अशा अधिकाऱ्यांवर मक्तेदारांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्या कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व नागरीकातून होऊ लागली आहे

Join our WhatsApp group