इचलकरंजी ; तारदाळ ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज सर्व राजकीय नेते शक्ती प्रदर्शन करत तहसील कार्यालयात दाखल

हातकणंगले तालुक्यातील पंचवर्षी ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरताना तारदाळ गावातील सर्वच राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे तारदाळ ग्रामपंचायत भ्रष्टाचार मुक्त या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार खडे करून आज हातकणंगले तहसील कार्यालय मध्ये दाखल केले आहेत.

निवडणूक आयोगाने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तारदाळ गावामध्ये गेल्या काही वर्षापासून विकास झाला नाही या ठिकाणी गावचे रस्ते गटर पाणी सारखे व्यवस्था आजपर्यंत कुठले राजकीय पक्षांनी केले नाही याच अनुषंगाने स्थानिक स्वराज्य आघाड्या तयार झाल्या आहेत यामध्ये हाळवणकर आवाडे गट महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी यासारखे पक्ष आपापल्या उमेदवारांना उमेदवार देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

आज शेवटच्या दिवशी अर्ज भरताना सर्वच राजकीय पक्षांनी ताकद लावून आपला उमेदवार कसा निवडून येईल याकडे सर्व लक्ष दिले आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कार्यकाल दोन दिवस आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोण राहणार कोण निवडून येणार मतदार राजा कोणाला कौल देणार तसेच जनतेतून थेट सरपंच निवड होत असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने आपला सरपंच पदाचा उमेदवार दिला आहे तारदाळ गावामध्ये सध्या बऱ्याचशा समस्या असल्यामुळे नव युवकांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे कोण निवडून येणार कोणाची सत्ता येणार मतदाराच्या कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आज उमेदवारी अर्ज भरताना हातकणंगले तहसील कार्यालयावर मोठी गर्दी झाली होती

Join our WhatsApp group