इचलकरंजी येथील कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या नृसिंह सरस्वती दत्त मंदिरात परमपुज्य भानूदास सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी दत्त जन्मकाळ निमित्त सकाळी १० ते २ श्री सत्यदत्त पुजा व पादुका अभिषेक सौ. व श्री किरणकुमार कुंभार यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच दुपारी २ ते ४ या वेळेत माऊली महिला भजनी मंडळ यांचे भजन, संध्याकाळी ५ ते ६ प्रा. आर. आर. चौगुले, शिंगणापूर यांचे प्रवचन व संध्याकाळी ६. १५ वा. दत्त जन्मकाळ सोहळा, आरती व पुष्पवृष्टी, पाळणा गान, रात्री ७ वाजता आमदार प्रकाश आवाडे, सुधाकर मणेरे, मुकूंद फाटक, अॅड. मोरेश्वर सहस्त्रबुध्दे, अजितमामा जाधव, संजय कांबळे, विलास पाडळे, नितेश पोवार यांच्या हस्ते प्रसाद वाटप होणार आहे. रात्री ८ ते १० सहदेव खरशे व सहकारी मुडशिंगी यांचे हरीभजन होवून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व बंधू भगिनीनी श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे विनायक सुर्यवंशी यांनी केले आहे.