तळीरामांना दणका, नव्या वर्षात वाढणार बिअरच्या किंमती, ‘या’ कारणांमुळे दरवाढ..!!

नव्या वर्षात, अर्थात 1 जानेवारी 2023 पासून बिअरच्या किमतीत सरासरी 10.7 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जगातील प्रसिद्ध बिअर कंपनी ‘हेईन्केन एनव्ही’ने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी ‘किंगफिशर’ आणि ‘हेनेकेन’ नावांनी बिअर बनवते.

‘या’ कारणामुळे होणार दरवाढ

देशांतील केटरिंग व्यावसायिकांना बिअर ट्रेडिंग कंपनीने नुकतीच माहिती दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कच्चा माल व ऊर्जेच्या वाढत्या किमतीमुळे बिअरच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

कंपनीने याआधी ऑगस्ट-2023 मध्ये बिअरच्या किमती 5.8 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. त्यानंतर नव्या वर्षात पुन्हा एकदा दरवाढ होणार असल्याने मद्यप्रेमींना मोठा दणका बसला आहे.

गेल्या दोन वर्षात बिअरच्या किमती वाढल्या असल्या, तरी बिअरच्या मागणीही कमी झालेली नाही. विशेषत: प्रीमियम बिअरला मोठी मागणी आहे. गेल्या सहा महिन्यांत बिअर विक्रीतून मिळालेल्या करापोटी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत तब्बल 10 हजार कोटी जमा झाले आहेत.

Join our WhatsApp group