बांगलादेश दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू वन-डे मालिकेतून बाहेर..

भारत व बांगलादेश यांच्यातील वन-डे मालिकेला उद्यापासून (ता. 4) सुरुवात होत आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे.

ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर प्रशिक्षण सत्रादरम्यान शमीच्या खांद्याला दुखापत झाली होती. सध्या बंगळुरुतील एनसीएमध्ये मेडिकल टीम त्याच्यावर उपचार करीत आहे. या दुखापतीमुळे त्याने वन-डे मालिकेतून माघार घेतलीय.

शमीच्या जागी उमरान मलिक

भारतीय वरिष्ठ निवड समितीने शमीच्या जागी उमरान मलिक याची संघात निवड केली आहे. शमीच्या आधी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाही संपूर्ण मालिकेतून बाहेर झालाय. बुमराह व हार्दिक पांड्याही नसल्याने भारतीय गोलंदाजी कमकुवत दिसतेय.

‘दुखापत सर्वसाधारणपणे प्रत्येक क्षणाचं महत्त्व ओळखण्यास शिकवते. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला दुखापतींचा सामना करावा लागलाय. प्रत्येक दुखापतीनंतर मी आणखी मजबूत होऊन परतलोय..’ असे ट्वीट शमीने केले आहे.

Join our WhatsApp group