इचलकरंजीत मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न : 3500 स्पर्धकांचा समावेशइचलकरंजी शहरामध्ये इचलकरंजी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये आफ्रिका हून आलेल्या दोन स्पर्धकांनी 42 किलोमीटर मध्ये पहिला क्रमांक तर 21 किलोमीटर मध्ये पहिला क्रमांक पटकावला तसेच कोल्हापूर सांगली सातारा मुंबई पुणे बेळगाव सोलापूर आदी व शहरातील परिसरातील मॅरेथॉन साठी 3500 स्पर्धकांनी मॅरेथॉन स्पर्धेला सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा 42 किलोमीटर 21 किलोमीटर 10 किलोमीटर 5 किलोमीटर अशा चार विभागांमध्ये करण्यात आली होती ही मॅरेथॉन स्पर्धा राजवाडा DKTE येथून सुरुवात झाली याला आमदार प्रकाश आवाडे यांनी झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात केली.

शहरांमध्ये आज उत्साहाचे वातावरण होते नागरिकांनी या सर्वांचे बँड बाजा वाजवून लेझीम वाजवून स्वागत केले स्पर्धकांना उत्साह वाढवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या स्पर्धेमध्ये 5 वर्षापासून ते सुमारे 90 वर्षाच्या स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन इचलकरंजी I M FEET क्लब यांनी केले होते हि स्पर्धा DKTE कॉलेज मधून सुरुवात झाली ते गांधी पुतळा जनता बँक चौक छत्रपती शिवाजी महाराज शाहू पुतळा कोल्हापूर नाका ते कबनूर व्यंकटेश्वरा हायस्कूल माणगाव फाटा परत शहरांमध्ये परतून पुन्हा DKTE कॉलेज असा मार्ग करण्यात आला होता या स्पर्धेमध्ये शासकीय कर्मचारी पोलीस नगरपालिका कर्मचारी अधिकारी महसूल अधिकारी यांनी सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवला होता

या स्पर्धेमध्ये बालचिमुकल्याने सहभाग नोंदवला होता न थांबतां पळत हि स्पर्धा पूर्ण केली गेल्या तीन वर्षापासून कोरोना महामारीमुळे मॅरेथॉन स्पर्धा झाली नव्हती पुन्हा या वर्षी मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली हि स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शहरांमध्ये एक उत्साहाचे वातावरण होते शहराच्या चौका चौकामध्ये स्पर्धकांचे स्वागत व त्यांना मनोबल देण्याचे काम सुरू होते व काही शाळांनीहि सहभाग नोंदवला होता त्यामुळे स्पर्धेला चांगलाच रंग आला होता 42 किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक 42004 द्वितीय क्रमांक42009 तृतीय क्रमांक42008 , 21 किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक21019 द्वितीय क्रमांक212187 तृतीय क्रमांक21002 दहा किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक10769 द्वितीय क्रमांक10023 तृतीय क्रमांक10588 असे नंबर काढण्यात आले आहे तसेच रनिंग करून आल्यानंतर झुम्बा डान्स घेण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रम स्थळी डीजे ही आणण्यात आला होता यावेळी डीजेच्या तालावर तरुणाई वृद्धांनी झुम्बा डान्स करत गाण्याचा तालावर नाचण्याचा आनंद घेतला सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचे वातावरण होते या कार्यक्रमाला शहरातील पोलीस दल DKTE कॉलेज व तसेच माजी नगरसेवक संतोष शेळके आमदार प्रकाश आवाडे व I M FEET क्लबचे सर्व मेंबर्स यांचा सहभाग लाभला

Join our WhatsApp group