इचलकरंजी ; गायरान अतिक्रमण संदर्भात उच्च न्यायालयात दात मागण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : आ.प्रकाश आवाडे

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गायरानातील अतिक्रमणे निष्कासित करण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यामध्ये युक्तीवाद ऐकून घेवून न्या. सी. के. कौल व न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने या संदर्भात उच्च न्यायालयामध्येच दाद मागावी असे आदेश दिले, असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.



उच्च न्यायालयाने गायरानातील अतिक्रमणे निष्कासीत करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू झाली असून महसुल विभागाकडून अतिक्रमण हटवण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. या आदेशामुळे हजारो कुटुंबे उघड्यावर पडणार असल्याने अतिक्रमण काढण्यास विरोध होत आहे. त्याच अनुषंगाने अतिक्रमणधारकांची बाजू घेत सर्वोच्च न्यायालयात आमदार प्रकाश आवाडे यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.



न्या. सी. के. कौल व न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर माझ्या वतीने ज्येष्ठ वकील आर. वसंत यांनी युक्तीवाद केला. त्यांना ॲड. प्रविण सटाले यांनी सहाय्य केले. ज्या भूमीहीन लोकांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना यापूर्वी शासनामार्फत प्लॉट अलॉटमेंट दिले आहे. रितसर सनद देण्यात आली आहे. तरीही त्यांना अतिक्रमण निष्कासित करण्याच्या नोटीसा लागू केल्या आहेत. ही अतिक्रमणे अनेक वर्षांपासून असून नागरिक तेथे वर्षानुवर्षे राहत आहेत. हे अतिक्रमण काढल्यास अनेक कुटुंबाना बेघर होऊन रस्त्यावर यावे लागणार आहे, त्यांचे संसार उघड्यावर पडणार आहेत यासह त्यांच्या व्यथा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणेत आल्या. युक्तीवाद ऐकून घेवून याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याविषयीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालय येथे या संदर्भात दाद मागणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.

Join our WhatsApp group