दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात सर्दी-खोकल्याच्या औषधांचा तुटवडा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या महिन्याभरापासून सर्दी खोकल्याच्या औषधांचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे.तरी रुग्णालय प्रशासनाने व संबंधित विभागाने त्वरित औषधांचा पुरवठा उपलब्ध करावा अशी मागणी सर्वसामान्य रुग्णवर्गातून होत आहे.

सध्या हवामानातील बदलामुळे परिसरात सर्दी खोकल्याच्या रुग्णांची वाढ झाली आहे. दत्तवाड ग्रामीण रुग्णालय येथे तज्ञ डॉक्टरांमार्फत अल्प खर्चात चांगले उपचार होत असल्याने या रुग्णालयात दत्तवाडसह परिसरातील नवे व जुने दानवाड, घोसरवाड, टाकळीवाडी, राजापूर, खिद्रापूर तसेच सीमाभागातील सदलगा, मलिकवाड आदी भागातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र गेल्या महिन्याभरापासून रुग्णालयात विशेषता सर्दीवरील उपचारासाठी देण्यात येणारे सिट्रझेन | हे औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना इतर औषधे उपलब्ध होऊनही सर्दीवरील औषध बाहेरून खरेदी करावे लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने व संबंधित विभागाने रुग्णांची होणारी ही गैरसोय त्वरित दूर करावी व औषध पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी दत्तवाडसह परिसरातील नागरिक व रुग्णातून होत आहे.

Join our WhatsApp group