गरिबांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, केंद्र सरकार वाढवू शकते उज्ज्वला योजनेचे बजट

सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 1 हजार रुपयांवर आल्या आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या अर्थसंकल्पात स्वयंपाकघरातील खर्च कमी होण्याची आशा देशभरातील महिला वर्गाला लागून राहिली आहे. यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लोकांना गॅस सिलिंडरचे मोफत वाटप केले जात आहे. हे जाणून घ्या कि, चालू आर्थिक वर्षात सरकारने या योजनेसाठी सुमारे 5812 कोटींचे बजट ठेवले होते. याशिवाय या योजनेंतर्गत वर्षातील 12 सिलेंडरवर 200 रुपयांची सबसिडी देखील देण्यात येते आहे. अशा परिस्थितीत हे अनुदान सरकार कडून मिल्ने यापुढेही सुरूच राहील, अशी अपेक्षा मध्यमवर्ग करत आहे.

हे जाणून घ्या कि, उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या 12 गॅस सिलेंडरवर केंद्र सरकार कडून सबसिडी दिली जाते. ज्याअंतर्गत लोकांना प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर 200 रुपये दिले जातात. आता पुढील आर्थिक वर्षासाठीही सरकार हे सुरूच ठेवण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही योजना 100% लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार ती आणखी पुढे वाढवू शकते.

गेल्या काही वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत याचा भार गरिबांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मे 2021 मध्ये 200 रुपयांच्या सबसिडीची घोषणा केली होती. एका आर्थिक वर्षात फक्त 12 सिलेंडरसाठी ही योजना लागू होती. तसेच 9 कोटींहून जास्त लोकांना या योजनेचा फायदा झाला. चालू आर्थिक वर्षासाठी देखील सरकारने 5812 कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे.

उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लोकांना एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते. यासाठी त्यांना 1,600 रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. याशिवाय फ्री रिफिल आणि स्टोव्ह देण्याची देखील तरतूद केली गेली आहे. 2016 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. यानंतर 10 ऑगस्ट 2021 रोजी उज्ज्वला 2.0 आणली. ज्याअंतर्गत, वंचित कुटुंबांनाही गॅस सिलेंडर पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. Budget 2023

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pmuy.gov.in/

Join our WhatsApp group