Union Budget 2023-24 काय स्वस्त झाले…काय महाग झाले?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर केला. हे मोदी सरकार 2.0 मधील पाचवं आणि शेवटचं बजेट आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 हे अमृत काळातील पहिलं बजेट असल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली. त्यामुळे बजेट मध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आणि कोणत्या महागल्या हे जाणून घेऊया.

या वस्तू झाल्या स्वस्त :

– एलईडी टेलिव्हिजन होणार स्वस्त.

– तसेच बायो गॅसशी संदर्भातील वस्तूंची दरही कमी होतील.

– खेळणी, सायकल स्वस्त

– मोबाईल फोन, टेलिव्हिजन होणार स्वस्त. देशातील मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मोबाईल फोन्सच्या भागांच्या आयातीवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव.

– बॅटरी वरील आयात शुल्क होणार कमी

– सीमा शुल्क 13 टक्के करण्यात आले.

या वस्तू महागल्या :

– स्वयपाकाच्या गॅसची चिमणी होणार महाग

– सोन्या-चांदीचे दागिने महागणार

– सिगारेट होणार महाग

Join our WhatsApp group