दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच दहावी बारावी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर बोर्डाने हे पाऊल उचलले आहे.
याआधी अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता घेतल्या जाणार आहे.