मनसेतून शिंदे गटात आलेल्या नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; नेमकं कारण काय?

मनसेतून शिंदे गटात दाखल झालेल्या एका नेत्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामागचे नेमके कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

शिंदे गटाचे बाळासाहेबांची शिवसेना माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

माझिरे यांच्या पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी हा वाद नेमका काय होता हे अजून समजले नाही.

Join our WhatsApp group