तुर्कीत विनाशकारी भूकंपानंतर आता पुराचे थैमान; १४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

तुर्कस्तान आणि सीरियाला हादरवलेल्या सहा फेब्रुवारीच्या विनाशकारी भूकंपाने अख्या जगाला हादरवून टाकले. या भूकंपात ५५,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.अजूनही भूकंपाचे धक्के तुर्कस्तान आणि सीरियात बसत आहेत. हे असतानाच आता भूकंपग्रस्त भागात पुराने थैमान घातले आहे. या पूरात आतापर्यंत १४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर बातमी.

तुर्कीमध्ये भूकंपग्रस्त भागात मंगळवारी (दि.१४) रात्री पावसाने थैमान घातले. तुर्की हमावान विभागाने इशारा दिला होता की पाऊस बुधवारी (दि१५) रात्री पर्यंत शक्यता वर्तवली होती. पुराचं पाणी भूकंपग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या ठिकाणी घुसलं. विनाशकारी भूकंपात ५५,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. जिवीत आणि वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. हे असतानाच आता पुराचं संकट तुर्कीवर आलं आहे. पुरग्रस्त भागात बचाव कार्य सुरु आहे. आतापर्यंत या पुरात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Join our WhatsApp group