Friday, June 2, 2023
Homeइचलकरंजीइचलकरंजीत रंगला महाराष्ट्र केसरीचा थरार ; कुस्ती प्रेमींनी केली अलोट गर्दी!

इचलकरंजीत रंगला महाराष्ट्र केसरीचा थरार ; कुस्ती प्रेमींनी केली अलोट गर्दी!

इचलकरंजी शहरात प्रथमच कुमार महाराष्ट्र केसरीचा थरार रंगला.या स्पर्धेत लातूरच्या सोनबा लवटे या मल्लाने प्रतिस्पर्धी सोलापूर जिल्ह्याच्या आर्यन पाटीलवर ७ गुणांच्या फरकाने विजय मिळवत कुमार महाराष्ट्र केसरीच्या गदावर नाव कोरले. या स्पर्धेत तब्बल १७० गुण मिळवत कोल्हापूर जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले.तर १४५ गुणांसह कोल्हापूर शहर संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.


दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत राज्यातील ३८ संघ सहभागी झाले होते. विविध १० वजनी गटातून ३८० हुन पैलवानांच्या कुस्त्या खेळावल्या गेल्या.दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रानंतर अंतिम फेरीत ४० मल्ल एकमेकांशी भिडले. यातून कुमार महाराष्ट्र केसरीसह प्रत्येकी वजनी गटातून १० मल्लांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. या कुस्ती स्पर्धेसाठी एकूण ३५ पंचांनी काम पाहिले. राज्यात प्रथमच ही स्पर्धा इचलकरंजी शहरात होत असल्याने परिसरातील कुस्ती प्रेमींनी गर्दी केली होती.

यावेळी माजी खासदार कल्लाप्पाना आवाडे,माजी आमदार सुरेश हाळवणकर,बाळासाहेब भानगिरे,तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील,सचिव महादेवराव आडगुळे,उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अशोक माने,बाबुराव दांडगे,कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे,मास्को विजेते संभाजी वरुटे,उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमामा भोसले,अमित गाट,मोहन सादळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group