Friday, June 2, 2023
Homeब्रेकिंगहा तर जम्बो किंगचा बाप; तरुणाने तयार केला तब्बल अडीच किलोचा वडापाव!

हा तर जम्बो किंगचा बाप; तरुणाने तयार केला तब्बल अडीच किलोचा वडापाव!

दाबेलीसाठी प्रसिद्ध असलेल्या कच्छमध्ये वडापावचीही मोठी चलती आहे. मुंबई स्टाइल वडापाव व्यतिरिक्त येथे कच्छ स्टाइल वडापावही मोठ्या आवडीने खाल्ला जातो.भुजच्या एका तरुणाने तब्बल 2.65 किलोचा जम्बो वडापाव तयार केला आहे. या वडापावचं वजन पाहून अनेक जणं हैराण झाले आहेत.

भुजच्या एका तरुणाने तब्बल 2.65 किलोचा जम्बो वडापाव तयार केला आहे. या वडापावचं वजन पाहून अनेक जणं हैराण झाले आहेत. संदीप बुद्धभट्टी आणि त्यांचा मुलगा देव बुद्धभट्टी हे गेल्या सात वर्षांपासून भुजमध्ये वडापाव आणि भजीचा व्यवसाय करतात. काहीतरी वेगळं करण्याचा विचार करीत यांनी जम्बो वडापाव तयार केला.

तब्बल अडीच किलोचा वडापाव तयार करताना संदीप आणि देव यांना अनेकदा अपयश आलं.
मात्र सातव्यांदा त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात 2.65 किलोचा वडापाव तयार केला. ज्यात 1.25 किलोचा वडा आणि 650 ग्रॅमचा पाव आहे. देवला 2.65 किलोचा वडापाव तयार करण्यासाठी इन्फ्लूएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि सोसायटी प्लांट फाऊंडेशनद्वारा जगातील सर्वात मोठा वडापाव तयार करण्यासाठी सन्मानित करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group