गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या इचलकरंजी शहरवासियांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला. सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. रात्री पुन्हा पावसाने हजेरी दिल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दिवसेंदिवस वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागात येत्या काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.
त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. इचलकरंजी शहर परिसर सुद्धा वाढत्या उष्म्याचा त्रास होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरवासिय पावसाच्या प्रतिक्षेत होते.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील काही भागात पावसाने हजेरी दिली. तर काही भागात हुलकावणी दिली. रात्रीच्या सुमारास अचानक वादळी वारे सुटून पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.