सांगली नाका परिसरातील अपार्टमेंटमधील प्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी ९ हजाराची रोकड आणि सोन्याचे दागिने व अन्य साहित्य असा सुमारे सव्वालाखाचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी रनसिंग दयानंद चौधरी (वय ३६) यांनी गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सांगली नाका परिसरात असलेल्या पाटील व्हिला अपार्टमेंटमध्ये रनसिंग चौधरी हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने घरात प्रवेश करत ९ हजाराची रोकड, २ तोळ्याची सोन्याची चेन, २ ग्रॅमचे कानातील टॉप्स यासह पॅनकार्ड, वाहन परवाना, २ एटीएम कार्ड असा सुमारे सव्वालाखाचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.