Friday, June 2, 2023
Homeब्रेकिंगबस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू!

बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू!

महाराष्ट्रात एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर ही खाजगी बस तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यन्त 12 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 25 पेक्षा अधिक जखमी आहेत. जखमींना बाहेर काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. त्यावेळी पहाटे चारच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या मागील घाटात बस दरीत कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. बसमध्ये जवळपास 40 प्रवाशी होते. त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा अधिक जखमी झालेत. मृतांची संख्या वाढतच चालली आहे.

दरम्यान, या भीषण अपघातांनंतर पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहेत. आत्तापर्यंत 25 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे तर अजून 25 ते 20 प्रवाशी अडकल्याची माहिती आहे. जखमींवर खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group