यंदाच्या २०२३ या वर्षात अवकाळी पाऊस राज्याच्या प्रत्येक भागात थांबून का होईना झाला आहे. परंतु या पावसाचा कोणताही नफा शेतकऱ्याला झाला नाही. अशातच परवा नाशिक आणि पुणे विभागात पावसाने जोरदार हजेरी लावली. आज (ता. १५) या दिवशी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
खालील विभागातील शहरात येलो अलर्ट जारी :
मध्य महाराष्ट्र : सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मराठवाडा : धाराशिव, लातूर.
विदर्भ : अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा. या विभागात अवकाळी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.