जत तालुक्यातील तिकोंडी येथील शाळकरी मुलाचा एनर्जी ड्रिंक प्यायल्यानं मृत्यू झाल्याचा दावा मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. वृषव अशोक राचगोंड (वय १६) असं मृत मुलाचं नाव असून या वृत्ताबाबत अद्याप डॉक्टरांकडून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
वृषवला एनर्जी ड्रिंक प्यायची लागली सवयवृषव हा तिकोंडी येथील बसवेश्वर हायस्कूल येथे नववी वर्गामध्ये शिकत होता. सध्या नववीची परीक्षा सुरू असून वृषवने काही पेपर दिले होते. वृषवला एनर्जी ड्रिंक प्यायची सवय लागली होती. शनिवारी त्याने लागोपाठ तीन बॉटल एनर्जी ड्रिंकचे प्राशन केले. काही वेळाने त्यास बसल्या ठिकाणी चक्कर आली व जमिनीवर पडला. नातेवाईकांना समजल्यानंतर ते वृषवला घेऊन उपचारासाठी जत येथे जात होते. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.