सरकार प्रत्येकवर्षी 6 टक्क्यांपेक्षा जास्त खराब झालेले धान्य खरेदी करीत नाही. परंतु यावर्षी युपीचं राज्य सरकारने हे प्रमाण 18 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेदेशात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेचं नुकसान केले आहे. देशात अनेक राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. यावर्षी पिकांची इतकी नासाडी झाली आहे की, धान्य खराब झालं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अधिक चिंतेत आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची अजून शक्यता आहे. पण असं असताना उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांकडे असणारा खराब गहू खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे