Kolhapur : कुणाला कशात आनंद मिळेल काही सांगता येत नाही. कुणी नोकरी लागल्याचा आनंद साजरा करतो. तर कुणी मुलंबाळ झाल्याचा आनंद साजरा करतो. आनंदाला काही सीमा नसते. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीनं आनंद साजरा करत असतो. ही गोष्ट आहे कोल्हापुरातल्या पाटील कुटुंबीयांची. गिरीश पाटील हे सॉफ्टवेअर इंजिनीअर (Software engineer)लग्न होऊन सात वर्षे झाली. पण, मुलबाळं नव्हतं. त्यामुळे हे दाम्पत्य काहीसे नाराज होते. नातेवाईक वारंवार विचारणा करायचे. लग्नाला चार-पाच वर्षे झालीत. अजून काही नाही का. यामुळे त्यांचं मन खट्टू व्हायचं. पण, इलाज नव्हता. बऱ्याच ठिकाणी औषधोपचार(Medicine) घेतला. पण, काही फायदा झाला नाही.लग्नाच्या सात वर्षानंतर मनीषा पाटील यांना दिवस गेले. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी बाळ झालं. त्याचा आनंद या दाम्पत्याच्या मनात होता. त्यामुळे गिरीश पाटील यांनी मुलीची चक्क हत्तीवरून वरात काढायचं ठरवलं. या त्यांच्या कृतीमुळे सारे अचंबित झाले.चक्क हत्तीवरून मिरवणूक
घरी मुलगी जन्माला आले की काही ठिकाणी नाराजीचा सूर असतो. मात्र कोल्हापुरातील पाचगावमधल्या पाटील कुटुंबीयांनी एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला. पाचगावमधील शांतीनगरमध्ये राहणाऱ्या पाटील कुटुंबीयांनी घरी जन्माला आलेल्या मुलगी इरा हिची चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत स्वागत केलं.