Friday, March 29, 2024
HomeबिजनेसMukesh Ambani | स्वस्त शेअरची लॉटरी, रिलायन्सच्या या स्टॉकची बातच न्यारी

Mukesh Ambani | स्वस्त शेअरची लॉटरी, रिलायन्सच्या या स्टॉकची बातच न्यारी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक आहेत. त्यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी आहे. तिचे बाजारातील भांडवल 15.55 लाख कोटी रुपये आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांची नवीन कंपनी जिओ फायनेन्शिअल शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. या कंपनीचे मूल्य 1.50 कोटींच्या घरात आहे. रिलायन्सच्या पंखाखाली अनेक लहान कंपन्या आहेत, या कंपन्यांच्या शेअरची किंमत 50 रुपयांच्या आत आहे. पण कमाईत या कंपन्यांनी इतर कंपन्यांना धोबीपछाड दिली आहे. कोणत्या आहेत या कंपन्या?

हॅथवे भवाली केबलटेल अँड डाटाकॉम लिमिटेड

आज कंपनीच्या शेअरमध्ये खास तेजी दिसली नाही. त्यामुळे कंपनीचा शेअर 19 रुपयांच्या जवळपास आहे. या कंपनीने एका महिन्यात गुंतवणूकदारांना 4.55 टक्क्यांचा निगेटीव्ह रिटर्न दिला आहे. तर कंपनीने तीन महिन्यात गुंतवणूकदारांना जवळपास 16 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीने 500 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

हॅथवे केबल अँड डाटाकॉम लिमिटेड

आज कंपनीच्या या शेअरमध्ये 2.50 टक्क्यांची घसरण झाली. तर गेल्या एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांचे 2.50 टक्के नुकसान केले आहे. गेल्या 6 महिन्यात कंपनीने 48 टक्क्यांचा परतावा दिला आहे. एका वर्षात कंपनीने 22 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. या वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांपेक्षा अधिकची कमाई करुन दिली.

आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड

मुकेश अंबानी यांच्या आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये आज 3.25 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्यामुळे कंपनीचा शेअर 19.35 रुपयांवर व्यापार करत आहे. एका महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना 2 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर 6 महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना 63 टक्क्यांहून अधिकची कमाई करुन दिली आहे. एका वर्षात कंपनीचा शेअर 22 टक्क्यांनी वधारला आहे. या वर्षात कंपनीने 23 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

मुकेश अंबानी यांच्या या मीडिया कंपनीचा शेअर आज 46 रुपयांवर व्यापार करत आहे. एका महिन्यात कंपनीचा शेअर फ्लॅट आहे. त्यात मोठी घडामोड घडलेली नाही. 6 महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना 60.49 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना जवळपास 23 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. तर पाच वर्षांत या मीडिया कंपनीने गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांची कमाई करुन दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -