ताजी बातमी ऑनलाईन टीम
पार्ले-जी बिस्किटच्या टेस्टची जादू अजूनही लोकांच्या जिभेवर रेंगाळत आहे. त्यामुळेच हा देशांतर्गत बिस्किट ब्रँड दीर्घकाळ लोकांची पहिली पसंती राहिला आहे. कांतार इंडियाच्या वार्षिक ब्रँड फूटप्रिंट रिपोर्टनुसार 2021 मध्ये भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंझ्यूमर प्रोडक्ट (FMCG) मध्ये बिस्किट ब्रँड पार्ले हा सर्वाधिक निवडलेला ब्रँड राहिला. सलग 10 वर्षे पार्ले या बाबतीत टॉपवर आहे.
10 वर्षांपासून पार्ले नंबर वन
कांतार इंडियाने आपल्या अहवालात कंझ्यूमर रीच पॉइंट (CRP) च्या आधारे 2021 मध्ये सर्वाधिक निवडलेल्या FMCG ब्रँडचा समावेश केला आहे. ग्राहकांनी केलेल्या खरेदी आणि कॅलेंडर वर्षातील खरेदीच्या फ्रक्वेंसीच्या आधारे कंझ्यूमर रीच पॉइंट मोजले जातात. गेल्या 10 वर्षांपासून, कांतार ब्रँडचे फूटप्रिंट रँकिंग जारी करत आहे.