निमशिरगावला विद्यार्थ्यांने तर उदगाव मध्ये महिलेची आत्महत्या

शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे विद्यार्थ्यांने तर उदगाव येथे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. सम्मेद सुकुमार खोत व 21 व अंजुम आरशद जमादार 37 अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांनी सांगितले की, सम्मेद हा डी फार्मसी शिकत होता. शुक्रवारी त्याचा निकाल लागला दुपारी तो घरी आला होता घरी मोठा भाऊ होता. खोलीची स्वच्छता करतो म्हणून सम्मेद खोलीत गेला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास त्याने स्लॅबच्या हुकास दुरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत उदगाव येथे राहत्या घरी फॅनला ओढणीच्या साह्याने अंजुम यानी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आला त्यांच्या पश्चात पती, तीन मुले असा परिवार आहे.

Join our WhatsApp group