मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाणार, मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवूनच परत येणार


मुंबई : राज्यात नवं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला आहे. तरी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा अद्याप पत्ता नाहीये. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा सवाल विरोधात रोज विचारत आहेत. तसेच त्यावरून बरीच टीका झाली आहे आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार, हे ठरलेलं उत्तर ८ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सलग एक महिन्यापासून देण्यात येते.मात्र तरी या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारा बाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवूनच एकनाथ शिंदे हे परत येण्याची ही दाट शक्यता आहे. त्यामुळे आता राज्याला लवकरच नवे मंत्रिमंडळ मिळण्याची आशा लागलेली आहे.

Join our WhatsApp group