जन्मदात्या आईने अवघ्या दीड हजारांत विकले बाळ, कारण ऐकून व्हाल हैराण!

ताजी बातमी ऑनलाईन टीम
जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या आईने आपल्या पोटच्या अडीच वर्षांच्या मुलाला अवघ्या दीड हजारात विकल्याची घटना घडली आहे. कोरोना काळामध्ये या महिलेच्या पतीचे निधन झाले. दरम्यान पदरात सात मुले होती. या मुलांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न महिले समोर होता. सात मुलांचे पोट भरणे कठीण झाल्याने महिलेने अवघ्या दीड हजारांमध्ये आपल्या पोटच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


अंमळनेरमध्ये घडली घटना
ही घटना अंमळनेरमधील आहे. येथे राहणाऱ्या कुटुंबावर कोरोना काळात मोठे संकट ओढावले. कुटुंबातील एकमेव अशा कमावत्या व्यक्तीचे निधन झाले. यामुळे संपूर्ण कुटुंबत उघड्यावर आले. सात मुलांचे पितृछत्र हरवले. अशा वेळी महिलेच्या खांद्यावर सात मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आली. आर्थिक परिस्थिती बिकट असताना या सात मुलांचे पोषण करणे असे मोठे संकट महिलेवर ओढावले. पती गेल्याचं मोठं दुःख असतानाच महिलेला आपल्या मुलांची भूक भागवायची होती.

Join our WhatsApp group