तारदाळात घरफोडी : दागिन्यांसह रोकड लंपास

ताजी बातमी ऑनलाईन टीम

घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी तारदाळ येथे कडी-कोयंडा उचकटून ५६ हजार ३०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. भरदिवसा घडलेल्या या चोरीने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अक्षय रघुनाथ कदम (वय २४ रा. चौंडेश्वरी कॉलनी तारदाळ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तारदाळ येथील चौंडेश्वरी कॉलनीत अक्षय कदम हे कुटुंबियासह राहण्यास आहेत. शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्यांचे घर बंद होते.हीच संधी साधत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरात ठेवलेले २० हजार रुपये किंमतीची ४ ग्रॅमची सोन्याची माळ, ३० हजाराची ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, बिछवा, मासोळ्या, सोन्याची नथ, सोन्याचे चार मणी, चांदीची लक्ष्मीची मूर्ती व २७०० रुपयांची रोकड असा ५६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अधिक तपास पोहेकॉ अवघडे करत आहेत.
तलवारी

Join our WhatsApp group