Income Tax Return फाईल करण्याचा आज शेवटचा दिवस उद्यापासून भरावा लागणार दंड


इनकम टॅक्स रिटर्न फाईल (ITR) भरण्याची आज शेवट तारीख आहे. सध्या असे दिसत आहे की, लोकांच्या मागणीनुसार ही तारीख वाढविण्यात येऊ शकते. पण जर सरकारने इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख वाढवली नाही तर आजच Income Tax Return भरण्याची शेवट संधी असणार आहे.ITR न भरल्यास द्यावा लागेल दंड
जर कोणत्याही कारणामुळे ३१ जुलैपर्यंत एखादी व्यक्ती इनकम टॅक्स रिटर्न भरू शकली नाही किंवा इनकम टॅक्स फाईल करू शकली नाही. तर त्याला इनकम टॅक्स रिटर्न भरताना किंवा फाईल करताना दंड भरावा लागणार आहे. इनकम टॅक्सच्या कायद्यानुसार ३१ जुलै, २०२२ पर्यंतच दंड आणि टॅक्सशिवाय इनकम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. ३१ जुलैनंतर इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची संधी मिळणार नाही. या तारखेनंतर इनकम टॅक्स डिपार्टमेंट टॅक्स भरणाऱ्यांविरूद्ध कारवाई देखील करू शकते. शेवटच्या तारखेनंतर टॅक्स डिपार्टमेंटकडून टॅक्स रक्कमेवर अधिकचा व्याजदर देखील लावला जावू शकतो.

Join our WhatsApp group