PM Modi : नागरिकांनी आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्टला तिरंगा लावावा : पंतप्रधानांचे आवाहननवी दिल्ली; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरावर तिरंगा लावावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना केले. तिरंगा आपणा सर्वांना जोडण्याचे काम करतो आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो, असे सांगतानाच २ ते १५ ऑगस्ट या काळात नागरिक आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर तिरंगा लावू शकतात, असेही मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले.


पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात विविध विषयांवर मत व्यक्त केले. त्यात आयुष मंत्रालयाची उपलब्धी, स्टार्टअप्स्, औषधांवरील संशोधन आदी विषयांचा समावेश होता. खेळण्यांच्या उत्पादनात देश प्रगती करीत असून, मागील काही वर्षांत खेळण्यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या लढाईत रेल्वेने दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. जुलै महिन्यात ‘स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि रेल्वे स्टेशन’ ही मोहीम सुरु करण्यात आली होती. देशातील अनेक रेल्वे स्थानके अशी आहेत, की जी इतिहासाशी जोडली गेलेली आहेत.

Join our WhatsApp group