इचलकरंजी ; ईडीच्या कारवाई विरोधात मलाबादे चौकात शिवसेनेची निदर्शने

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपच्या बी टीम म्हणजे ईडी यांनी जी सूडबुद्धीने कारवाई केली आहे ती कारवाई त्वरित थांबवावी नाहीतर कोल्हापूरी पायतानाचा प्रसाद देऊ असा इशारा आज या निदर्शनावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला व या कारवाईचा निषेध केला.यावेळी शहरप्रमुख सयाजीराव चव्हाण, माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे यांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला या निदर्शनावेळी माजी शहरप्रमुख महेश बोहरा, धनाजी मोरे,युवा सेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, आप्पासाहेब पाटील भरत शिवलिंगे, उपशहरप्रमुख लक्ष्मण पाटील, संतोष गौड,दत्ता साळोखे, बाळासो मधाळे,राजू मोकाशी,संजय पाटील, दादा पारखे,गणेश शर्मा, विद्याधर पोवार.सागर जाधव.सरज लाड, बापू जाधव,दिलीप शिंदे, वसंत कसलकर, कुमार खांडेकर, अनिल जुवे, अमित पडियार,बजरंग लोखंडे, चंद्रजित लाड,अनिकेत तानुगडे, आदर्श तानुगडे ,संजय खोत, आप्पाजी पाटील इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.

Join our WhatsApp group