एसीचा स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू, स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

रविवारी रात्री चेन्नई येथील थिरू व्ही. का. नगर येथील एका घरात एसीचा स्फोट झाल्याने एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अचानक ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ माजली होती. झालेला स्फोट इतका भयानक होता, की तरूणाचा जागीच मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे एसीचा स्फोट झाला असावा असा अंदाज अग्निशमन आणि बचाव सेवा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पी. श्याम असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्यावेळी घरात एसीचा स्फोट झाला. त्यामुळे पी. श्याम हे घरातील तळमजल्यावर होते. तर त्याचे वडिल हे पहिल्या मजल्यावर होते अशी माहिती मिळाली आहे.

Join our WhatsApp group